कृषी संवाद पब्लिसिटीने आज पर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेती व शेती पूरक व्यवसायाचे तब्बल पाचशे हून अधिक प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. मागील नऊ वर्षापासून हा प्रवास अखंड सुरू आहे. मार्गदर्शनासह सोबत योग्य सल्ला, उत्तम मिळणारी कन्सल्टन्सी, शात्रोक्त योग्य माहिती व्यवसाय उभारणीसाठीची मदत तसेच विक्री, व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन व सहकार्य प्रशिक्षणार्थीस समाधान देते. महाराष्ट्रातील एकमेव कन्सल्टन्सी जी ऑनलाइन माफक दरात योग्य मार्गदर्शन करते. थेट प्रक्षेत्र भेटी अगदी बांधावर जाऊन सुद्धा मार्गदर्शन करते.
डिजिटल इंटरनेटच्या युगात योग्य माहिती व्यवसायिकांपर्यंत पोहोचावी जे ज्ञान कृषी विद्यापीठांमध्ये आहे ते सर्वसामान्यांपर्यंत सहजतेने पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कृषीतज्ञ रोहन कारोटे यांनी संवाद पब्लिसिटी ही शेती व शेतीपूरक व्यवसायाची कन्सल्टन्सी 2016 साली सुरू केली. शेळीपालन, कुक्कुटपालन, चंदन शेती, बांबू शेती, मशरूम लागवड, कृषी सेवा केंद्र व्यवसाय यासोबतच इतर शेती व शेतीपूरक व्यवसायांचे सखोल मार्गदर्शनासाठी कृषी संवाद पब्लिसिटी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
कृषितज्ञ श्री. रोहन मनोहर कारोटे यांनी कृषी अर्थशास्त्र विषयात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथुन एम.एस.सी चे शिक्षण पुर्ण केले आहे. देशातील नामांकित शेती शेत्रातील कंपन्यांसोबत त्यांनी शेतकऱ्यांसाठी कामे केली आहेत. उत्तम संभाषण, विषयातील विद्ववत्ता, शास्त्र शुद्ध माहिती सहजतेने पटवून देण्याची शैली, स्पुर्ती, सकारात्मकता आणि लाघवी स्वभाव प्रत्येक विद्यार्थ्यास आपलेसे करतो.
कृषितज्ञ श्री. रोहन मनोहर कारोटे